किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात पहिली अटक; एका शिवसैनिकाला घेतले ताब्यात
अमोल धर्माधिकारी, पुणे | भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal) झालेल्या हल्लाप्रकरणात आता पहिली अटक झाली आहे. एका शिवसैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सनी गवते असे त्या शिवसैनिकाचे नाव असून याप्रकरणी अधिक तपास सूरू आहे.
किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal) झालेल्या हल्लाप्रकरणी (attack Case) शिवसैनिकांवर (Shivsena Activists) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता. मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. आता या प्रकरणात कारवाईला वेग आला आहे. पुणे पोलिसांनी सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकवणाऱ्या सनी गवते या शिवसैनिकाला अटक केली आहे. तसेच आणखीन एका संशयिताला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.
मात्र या हल्ल्यातील शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे तसेच राज्य सचिव किरण साळी अद्याप सापडले नाही.त्यांचा पोलिस शोध घेत असून तपासासाठी पुणे पोलिसांकडून दोन पथक तैनात करण्य़ात आली आहेत. दरम्यान या प्रकरणात आणखीन हल्ला केलेल्या शिवसैनिकांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रकरण काय ?
जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी (ता.5) सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला. त्यानंतर सोमय्या यांच्या गाडीसमोर शहरअध्यक्ष मोरे हे झोपले. तर, इतर कार्यकत्यार्ंनी त्यांच्या गाडीवर हाताने व बुक्यांनी मारहाण केली. हातात दगड घेऊन सोमय्या यांच्या जिवास धोका पोहचविण्यास उद्देशाने थांबले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास विक्रम गौड हे करत आहेत.