पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग;  प्रेक्षकांची तारांबळ

पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग; प्रेक्षकांची तारांबळ

सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरु असताना आग लागल्यानं प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
Published on

पुणे : सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरु असताना आग लागल्यानं प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आजचा या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर येत आहे.

पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग;  प्रेक्षकांची तारांबळ
विद्येच्या माहेरघरात भोंदूगिरीचा प्रकार! पाय धुतलेले पाणी दिलं प्यायला आणि...

सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे. पं. सुहास व्यास यांच्या गायन संपलं होतं. त्यानंतर काही वेळ ब्रेक होता. यादरम्यान ही आग लागल्याची माहिती आहे. कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी असलेल्या ठिकाणी ही आग लागली आहे. यामुळे कार्यक्रमात प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मागे बसलेल्या प्रेक्षकांनी मंडपाच्या बाहेर धाव घेतली. मात्र फार मोठी आग नसल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात आले आणि कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com