वरुण सरदेसाई विरोधात 18 ठिकाणी तक्रार, भाजपा युवा मोर्चा आक्रमक

वरुण सरदेसाई विरोधात 18 ठिकाणी तक्रार, भाजपा युवा मोर्चा आक्रमक

Published by :
Published on

पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या विरोधात १८ ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रारी दाखल करण्यात आली. पोलिसांनी याची दखल घेत गुन्हा दाखल करून या प्रकरणी कारवाई
करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी वरुण सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वरुण सरदेसाई यांच्यावर मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राणेंच्या वक्तव्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. या विविध आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी भाजप कार्यालयाची तोडफोड आणि भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुंबईतील आंदोलनावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com