गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल

Published by :
Published on

केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पिचाई यांच्यासहीत कंपनीच्या पाच जणांविरोधात कॉपीराईट अधिनियमाच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील दर्शन यांचा एक हसीना थी, एक दिवाना था हा सिनेमा युट्यूबवर (YouTube) अपलोड करण्यात आला आहे. कोणतेही हक्क न घेता अधिकार नसलेल्या लोकांमार्फत गुगलने (Google) हा सिनेमा युट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिल्याचा आरोप दर्शन यांनी केला आहे. त्यामुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्याचा दावा दर्शन यांनी केला आहे.

दर्शन यांच्या या तक्रारीमुळे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि गुगलच्या इतर 5 लोकांविरुद्ध मुंबईत कॉपीराइट कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि निर्माते सुनील दर्शन यांनी कॉपीराइट प्रकरणी मुंबईतील न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com