अखेर प्रतिक्षा संपली… रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल
प्रतिनिधी: अरविंद जाधव
कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी कोरोनाच्या काळात सर्वांच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कोरोनाच्या या काळात अनेकांना वैद्यकीय सेवा देखील पोहचल्या नाहीत. राज्यात अनेक ठिकाणी अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागेले.
राज्यातील पाटण तालुका देखील कोरोना काळात मुत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. भौगोलिक डोंगरी रचनेनुसार गाव वस्ती ही डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात आहे. या करण्यामुळेच या भागात रूग्णवाहीका पोहचू शकत नव्हती. परंतु आता सातारा जिल्हा परिषद व सातारा आरोग्य विभाग अंतर्गत मोरगिरी आरोग्य केंद्रास मारूल हवेली जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ सुग्रा बशीर खोंदू यांच्या पाठपुराव्यामुळे व ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे आजपासून रूग्णवाहीका रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहे.
यावेळी यशराज देसाई यांनी सदर रुग्णवाहिकामुळे मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील जनतेला याचा लाभ होणार आहे असे मनोगत व्यक्त केले.