अंबरनाथमधील ‘त्या’ अपघातात पाचवा बळी

अंबरनाथमधील ‘त्या’ अपघातात पाचवा बळी

Published by :
Published on

मयुरेश जाधव | अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी घडली होती. या अपघातात आता पाचवा बळी गेला आहे. रिक्षात असलेल्या वलेचा कुटुंबातील १० वर्षीय चिमुकलीचाही ५ दिवसांनी अखेर मृत्यू झाला आहे.

रविवारी रात्री उल्हासनगरमधील वलेचा कुटुंबीय अंबरनाथच्या पालेगाव भागात रिक्षाने गणेश विसर्जनासाठी आलं होतं. यावेळी एका कारने त्यांच्या रिक्षेला दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षेतील वर्षा वलेचा (५१), आरती वलेचा (४१) आणि राज वलेचा (१२) या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. तर तर रिक्षाचालक किसन शिंदे यांनाही या भीषण अपघातात प्राण गमवावे लागले होते. या अपघातात लहर वलेचा ही १० वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर गेले ५ दिवस उपचार सुरू होते. मात्र अखेर तिचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं या अपघातातील मृतांची संख्या ५ वर गेली असून वलेचा कुटुंबातील मृतांची संख्या ४ वर गेली आहे.

दरम्यान, या अपघाताप्रकरणी कारचालक विनोद यादव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातानंतर उल्हासनगरमधील वलेचा कुटुंब मात्र पुरतं उध्वस्त झालं असून या बेदरकार कारचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com