महाराष्ट्र
दुधाला हमीभाव द्या… इंदापुरात शेतकऱ्यांचे आंदोलन
दुधाला हमीभाव मिळावा तसेच दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी इंदापूर येथे आंदोलन पुकारले. सुकाणू समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी निमगाव केतकीत आंदोलन केले.
लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दुधाचे दर कमी करून शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची राज्यभरातील लुट थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दूध दर २० रुपयांपर्यंत खाली आल्याने दुधाचा व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. ते परवडत नाही, अशी प्रतिक्रिया दूध विक्रेत्या शेतकऱ्यांनी केली.
विरोध दर्शवत दूध व्यवसायिक शेतकऱ्यांनी हातात दुधाच्या किटल्या घेऊन श्री गणेशाला दुग्धाभिषेक घातला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय.. चारा, पशुखाद्य तसेच पशुवैद्यकीय उपचार महागले आहेत. दुधाला हमी भाव द्यावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केलीय.