पैठणमधील शेतकरी अनुदानापासुन वंचित

पैठणमधील शेतकरी अनुदानापासुन वंचित

Published by :
Published on

सुरेश वायभट | पैठण : मागील वर्षी खरीप हंगमातील पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी पिकांना ही अवकाळी पावसाने धुतले. मात्र , शासनाकडून आद्यापही पुर्ण मदत मिळाली नाही. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना मदतीची खरी गरज असताना कोरोनाच्या महामारीतही शेतकरी दुर्लक्षित आहे.

सध्या खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे खते खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची धरपड चालु आहे. तालुक्यात शेतकर्यांना नुकसान भरपाईचा पहिला हाप्ता मिळाला, मात्र दुसर्या टप्यातील अनुदान आद्यापही शेतकर्यांना मिळाले नाही. शेतकर्यांना लवकरात लवकर दुसर्या टप्यातील नुकसान भरपाई अनुदान व पिकविम्याची रक्कम तत्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com