महाराष्ट्र
कौमार्य चाचणीत नापास; दोन नवविवाहितांचे लग्न मोडलं!
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून एक अघोरी प्रकार समोर आला आहे. कौमार्य चाचणीत नवविवाहिता नापास झाल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून विवाह मोडल्याची घटना घडली.या घटनेने खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कोल्हापूरमधील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील दोन सख्ख्या भावांशी झाला होता. विवाहाच्या पहिल्याच रात्री या दोन्ही तरुणींची कौमार्य चाचणी करण्यात आली होती. यापेक्षा धक्कादायक म्हणजे या चाचणीत दोन्ही तरुणी नापास ठरल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून जात पंचायतीने हा विवाह मोडीत काढला.
दरम्यान या घटनेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन दोन्ही नवरदेवांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.