महाराष्ट्र
भंडाऱ्यात आरोग्य शिबिरादरम्यान कालबाह्य औषधांचे वाटप
भंडारा जिल्ह्यात आयोजित एका खासगी आरोग्य शिबिरादरम्यान कालबाह्य औषधांचे वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगावमध्ये संबंधित प्रकार घडला आहे. लोकांना या घटनेची माहिती कळताच संताप व्यक्त होत आहे.
आसगाव येथे रविवार एका खासगी संस्थेद्वारे आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात निशुल्क रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याची रितसर दवंडी ही गावात पिटवण्यात आली होती. निशुल्क असल्याने गावातील लोकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
दरम्यान या शिबिरामध्ये अनेक रुग्णांच्या डोळ्याची तपासणी व शस्त्रकीया झालेल्या ड्रॉप चे वितरण करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला हे औषध कालबाह्य असल्याचे काही लोकांना दिसले. यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय.