महाराष्ट्र
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांकडून इशारा
कोरोना रुग्ण्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर दिला जात आहे. देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवली जात आहे.
कोरोनाच्या लाटेत जगभरात लाखो लोकांचे बळी गेले आहेत . त्यामुळे सगळीकडे मृत्यूचा तांडव पहायला मिळाला. सध्या सर्वत्र कोरोना आटोक्यात येत असतानाच पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेक जिल्ह्यांमधून कोरोना मोठ्या प्रमाणावर नाहीसा झालाय.
तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अजूनही कोरोना नियमांचे पालन करावे, असं सरकारकडून बजावण्यात येत आहे. भारतात कोरोनाची तिसरी संभाव्य लाट फेब्रुवारी-मार्च दरम्यान येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तरी ती जास्त घातक नसेल, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता थोडी कमी झाली आहे.