आधी महागड्या बाईक चोरायच्या अन् त्यावरुनच चैन स्नॅचिंग करायचे; चोर अटकेत

आधी महागड्या बाईक चोरायच्या अन् त्यावरुनच चैन स्नॅचिंग करायचे; चोर अटकेत

सोन्याची चैन मोबाईल फोन आणि पल्सर बाइक जप्त करण्यात पोलिसांना यश
Published on

संजय गडदे | मुंबई : महागड्या बाईक आधी चोरी करायच्या, मग त्यावरुन स्टंटबाजी करत चैन स्नॅचिंग करायची. अशा स्टंटबाज चोरांना कुरार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सोन्याची चैन, मोबाईल फोन आणि पल्सर बाइक पोलिसांना जप्त करण्यात आले आहे.

कुरार पोलिसांनी स्टंटबाज चोरांना अटक केली आहे. हे चोर चैन स्नॅचिंग आणि मोबाईल चोरण्यापूर्वी रस्त्यावर इम्पोर्टेड बाईक चोरी करत असे व त्या बाईक तो खड्ड्यात फेकून देत असे. याच बाईकच्या मदतीने शातीर चोर मुंबईच्या रस्त्यांवर बाईक स्टंट करायचा. व त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमातून अपलोड करत असे.

हा शातीर चोर मुंबईच्या गोवंडी परिसरात राहणारा आहे. यावर मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये मोबाईल चोरी आणि हत्यांचा प्रयत्न यासारखे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु प्रत्येक वेळी चेंन स्नॅचिंग करण्याच्या पूर्वी एक बाईक चोरून तो मुंबईच्या रस्त्यांवर स्टंट करून व्हिडिओ बनवत असे आणि सोशल माध्यम इंस्टाग्राम वर टाकून दुसऱ्या चोरीच्या घटनेला निघत असे.

कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी मोहम्मद मोहसिन लाईक अहमद अन्सारी उर्फ रायडर (वय 19) याने हायवेवर एक तृतीयपंथीयाच्या गळ्यातून चाळीस ग्राम सोन्याची चैन चोरून फरार झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.यानंतर डिटेक्शन टीम पोलीस निरीक्षक चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सपोनी पंकज वानखेडे, पोलीस हवालदार मोरे, भोगले, जाधव पोलीस शिपाई निलेश मांडवे पो.शि. तिजारे यांच्या पथकाने महामार्गावरील आणि मुंबईत विविध ठिकाणी तपास करून 70 सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली.

हा स्टंटबाज चोर इतका शातिर आहे की पोलीस मागावर आहेत असं समजलं की तो बाईक चोरून फरार होत असे. मात्र कुरार पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमने एक महिन्यापासून या चोरावर नजर ठेवून 19 जुलैला गोवंडी रेल्वे स्टेशन वरून त्याला अटक केली. आरोपी जवळून 30 ग्राम सोन्याची चैन , एक पलसर बाईक आणि ओप्पो कंपनीचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मालाड पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com