सापापासून बनवलेल्या दारूबद्दल ऐकलं आहे का? व्हायरल व्हिडिओ

सापापासून बनवलेल्या दारूबद्दल ऐकलं आहे का? व्हायरल व्हिडिओ

सहसा द्राक्षांपासून वाइन तयार केली जाते. पण तुम्ही कधी सापापासून तयार केलेल्या दारू बद्दल ऐकलं आहे का? चीन हा देश अन्नाच्या बाबतीत खुप विचित्र आहे.
Published by :
shweta walge
Published on

सहसा द्राक्षांपासून वाइन तयार केली जाते. पण तुम्ही कधी सापापासून तयार केलेल्या दारू बद्दल ऐकलं आहे का? चीन हा देश अन्नाच्या बाबतीत खुप विचित्र आहे. चीनमध्ये चिकन आणि मटणापेक्षा कुत्रा आणि मांजरीच्या मांसाला प्राधान्य दिले जाते. याशिवाय चीनमध्ये अनेक प्रकारचे साप, विंचू आणि इतर धोकादायक प्राणी खाल्ले जातात. अशातच आता सोशल मीडियावर स्नेक वाईनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. स्नेक वाईन या नावावरूनच असे समजते की ही सापापासून बनलेली वाइन आहे.

स्नेक वाईन कशी तयार होते

स्नेक वाईन बनवताना जिवंत सापाला वाईन असलेल्या बरणीमध्ये ठेवले जाते. दारू तोंडात गेल्यामुळे सापाला उलटी होते. ही उलटी दारूमध्ये मिसळते. यानंतर साप मरण पावतो आणि मद्यासोबत कुजतो व अशाप्रकारे वाईन तयार होते. चीन आणि जपानमधील लोक ही वाईन मोठ्या उत्साहाने पितात.

स्नेक वाईनचे फायदे

स्नेक वाईन नशेसाठी प्यायली जात नाही. लोक हे मद्य औषध किंवा टॉनिक म्हणून पितात. याचा आरोग्याला खुप फायदा होतो. कुष्ठरोग, जास्त घाम येणे, केस गळणे, त्वचा कोरडी पडने आणि इतर अनेक आजारांवर या मद्याचा सकारात्मक परिणाम होतो. चीन, जपान, कंबोडिया, कोरिया, लाओस, तैवान, व्हिएतनाम आणि थायलंडमध्ये ही दारू तुम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर मिळेल.

अनेकांना असा प्रश्न पडतो की ही वाईन पिणे सुरक्षित आहे का? याचे उत्तर हो असे आहे. जर अधिकृत विक्रेत्यांकडून ही वाईन खरेदी केली तर याचे सेवन सुरक्षित आहे. कारण, ही वाईन बनवण्यासाठी विषारी सापांचा वापर केला जात नाही. मात्र, ही वाइन पिणे धोकादायक ठरू शकते, असा इशाराही या वाईनच्या बाटलीवर देण्यात आलेला असतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com