धनुष्य बाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयुक्तांचे महत्त्वाचं वक्तव्य
राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु असताना अशातच आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या वादावरून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्याच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे. या निर्णयानंतर सर्व लक्ष निवडणूक आयोगाकडे गेले आहे.
आज निर्णयानंतर प्रश्नांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ते गुजरातमधील गांधीनगरमध्ये बोलत होते, ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देणे किंवा निवडणूक चिन्ह देण्याच्या अर्जावर ,' तसंच निवडणूक आयोगाकडे बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया आहे आणि या प्रकरणातही ती प्रक्रिया केली जाईल, असे विधान आयुक्त राजीव कुमार यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'राजकीय पक्षाबाबत आणि त्याच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आधीपासूनच आहे. शिवसेनेच्या प्रकरणातही संघटनेतील बहुमताची चाचणी करूनच आम्ही निर्णय घेऊ.अशी संपूर्ण प्रतिक्रिया यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बोलताना दिली.