Eknath Shinde : एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल होणार, फडणवीसांच्या भेटीची शक्यता!
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आलं होतं. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray Resigns) यांनी राजीनामा दिलाय. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज (30 जून) दुपारी मुंबईत दाखल होणार. यासाठी विमानतळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. तिथल्या गाड्या हटवण्याचं काम पोलिस करीत आहे. गेट क्रमांक आठमधून ते बाहेर पडणार आहेत.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. त्यानंतर अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनामा दिला. https://youtu.be/AhNsBAY6YyQ
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाणार -
मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन मानवंदना देणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील वंदन करणार आहोत. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळीदेखील जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.