महाराष्ट्र
Eknath Shinde |”महाडसाठी नगररचना विभागाच्या नियमांमध्ये बदल करणार”
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महाडमधील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाला भेट दिली. महाड शहरात बाजार पेठेत जाऊन सुरु असलेल्या स्वच्छतेच्या कामाची पहाणी करीत व्यापारी आणि नागरीकांशी संवाद साधला.
महाडकरांना धीर देताना नवीन घर बांधताना घरांच्या उंची वाढवा असा सल्ला देत महाडच्या सुरक्षेसाठी नगर रचना विभागाच्या नियमांमध्ये बदल करावा लागला तर केला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
महाडच्या पुराचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्यासाठी तज्ञ समितीची नेमणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.