भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत..., एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट

भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत..., एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट

भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आलं होतं. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray Resigns) यांनी राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदेकडून खळबळजनक ट्विट करण्यात आले आहे.

भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत..., एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत..., एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गट भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान,भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका. असे शिंदे यांनी ट्विट करत स्पष्ट केलं.

भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत..., एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट
Sanjay Raut: ठाकरे सरकार कोसळल्यानंतर संजय राऊतांचा मोठा निर्णय!

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com