भर पावसात मुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व कामांची पाहणी; म्हणाले, मी सरप्राईज...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर सांताक्रूझ येथील मिलन सबवेला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर सांताक्रूझ येथील मिलन सबवेला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणचा परिसर हा जलमय झाला होता. शहरात जागोजागी पाणी साचल्याने त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पाणी साचणाऱ्या जागाना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तसेच याठिकाणी पाणी साचू नये, असे सक्त निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आणि पालिका प्रशासनाला दिले. तसेच ट्रॅफिक जॅम होऊन इथे वाहने अडकून पडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com