महाराष्ट्र
Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं!
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटात ४० शिवसेना आमदार असल्याची माहिती आहे. आता यापुढे काय होणार हे पाहाणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय सर्व घडामोडींचे आणि क्षणाक्षणाचे (Maharashtra Political Crisis) अपडेट्स जाणून घ्या...
एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं , 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असं गटाचं नाव
Eknath Shinde Party Name: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचं नाव असून 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असं शिंदे गटाचं नाव असेल अशी माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिवसेना नाव न लावता जगून दाखवा, असे आव्हान बंडखोर शिवसेना आमदारांना करण्यात आले होते. त्याचआता शिंदे गटाकडून 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असं गटाचं नाव ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत मोठा निर्णय, आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट, असे नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती
संध्याकाळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आमदार दीपक केसकर यांनी नवी पक्ष निर्मितीची घोषणा केली. तसेच आमचे वेगळी युती असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांची भाजपशी युती होणार असल्याचे स्पष्ट त्यांनी सांगितले.