महाराष्ट्र
महाड शहराच्या स्वच्छतेसाठी दोन कोटींचा निधी मंजूर!
महाड शहरात आलेल्या महापूराला आज नऊ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. राज्यभरातील यंत्रणा कामाला लागल्या नंतरही सफाई पूर्ण होत नसल्याने आता नगरविकास मंत्रालयाने विशेष पावले उचलली आहेत.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज सफाईच्या अत्याधुनिक यंत्रणेसह महाड शहरात दाखल झाले असून ते स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. जवळपास 400 स्वच्छता दूत तसेच फवारणी मशनरी व औषधे घेऊन ही टिम महाडमध्ये दाखल झाली आहे.
सुरुवातीला महाड साठी अवघ्या पन्नास लाख रूपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता मात्र नगराध्यक्षा स्नेहल जगताप व आमदार भरतशेठ गोगावले यांनी मागणी केल्यानंतर आता दोन कोटी रुपये स्वच्छतेसाठी मंजूर झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.