पुण्यातील प्रकरणावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, हम छोड़ेंगे नहीं
एनआयए, ईडी-सीबीआय आणि पोलिसांनी त्यांच्या संस्थेविरुद्ध नुकत्याच टाकलेल्या छाप्यांविरोधात पीएफआय कॅडर एकत्र आले होते. आंदोलना दरम्यान, शुक्रवारी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांकडून 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर राज्यभर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याघटनेबाबत ट्विटकरत निषेध व्यक्त केला. सोबतच त्यांनी कठोर कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात बोलत असताना तेव्हा त्यांनी पुण्यातील घटनेवर जोरदार निषेध व्यक्त केला. त्यासंबंधी त्यांनी ट्विटवर देखील व्हिडिओ शेअर केला आहे. अगर नापाक इरादों से ‘पाकिस्तान ज़िंदाबाद’ के नारे लग रहे होंगे तो हम छोड़ेंगे नहीं, कार्रवाई होगी! असे त्यांनी ट्विटवर लिहले आहे.