एकनाथ खडसेंना ईडीकडून पुन्हा एकदा दिलासा, हायकोर्टातील पुढील सुनावणी गुरुवारी

एकनाथ खडसेंना ईडीकडून पुन्हा एकदा दिलासा, हायकोर्टातील पुढील सुनावणी गुरुवारी

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. खडसे यांच्या याचिकेवर गुरुवारी (२८ जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंत खडसे यांना अटक करणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे तूर्तास खडसे यांची अटक टळली आहे.
भोसरी भूखंड घोटळ्यात मनी लाँड्रिगचा ठपका ठेवत ईडीने खडसेंवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खडसेंची ईडीने चौकशी सुरू केली आणि त्यानंतर खडसेंचा 'तुम्ही ईडी लावा, मी सीडी लावतो' या वाक्यातील जोश कुठे गायब झाला ते कळलेच नाही. कारण गेल्या महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीत जोरात प्रचार करणारे आणि भाजपाला मुक्ताईनगरमध्ये छोबीपछाड देणारे एकनाथ खडसे ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर हायकोर्टात गेले आणि अटक होऊ नये, अशी मागणी केली. आतातर त्यांच्या वकिलाने खडसे आजारी असून ते आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे कोर्टात सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ईडीनेही पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी खडसेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे, मुंबई उच्च न्यायालयाल आता गुरुवारी सुनावणी होणार असल्याने त्यानंतर ईडीकडून कोणते पाऊल उचलले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com