नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आठ वर्ष, ‘अंनिस’ काढणार कॅडलमार्च
अमोल धर्माधिकारी | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या शुक्रवारी आठ वर्षं पुर्ण होतायत.त्यानिमित्ताने दाभोलकरांच्या स्मृतिदिनाच्या पुर्वसंध्येला अनिसकडून कॅडलमार्चचे आयोजन करण्यात आले आहे. अनिसचे कार्यकर्ते आणि दाभोलकर कुटुंबीय यामध्ये सहभागी होणार आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या शुक्रवारी आठ वर्षं पुर्ण होतायत. डॉक्टर दाभोलकरांची पुण्यातील ज्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली,तिथे या कॅडलमार्चचे आयोजन करण्यात आलेय. अनिसचे कार्यकर्ते आणि दाभोलकर कुटुंबीय यामधे सहभागी झालेत. उद्या अनिसकडून विठ्ठल रामजी पुल ते पुणे महापालिकेतील महात्मा फुलेंच्या पुतळ्यापर्यंत सकाळी आठ वाजता निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आलेय. डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात यावी अशी मागणी अनिसकडून यावेळी करण्यात येत आहे.