महाराष्ट्र
मराठवाड्यात 'या' 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
मराठवाड्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
कमलाकर बिरादार, नांदेड
मराठवाड्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी असल्याची माहिती मिळत असून सकाळी 7.15 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर होता, भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.