राज्यातील कोरड्या हवामानामुळे थंडी पुन्हा वाढणार

राज्यातील कोरड्या हवामानामुळे थंडी पुन्हा वाढणार

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आठवडाभर राज्यात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे... थंड वाऱ्यांचा वाढत प्रभाव तसेच राज्यातील कोरड्या हवामानामुळे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडू शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे.
Published by :
shweta walge
Published on

उत्तरेत थंड हवेचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वाढत प्रभाव तसेच राज्यातील कोरड्या हवामानामुळे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडू शकते.

या आठवड्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी-जास्त होत आहे. हरियानातील कर्नाल येथे ५.४ अंश सेल्सिअस इतकी देशातील सपाट भूभागावरील नीचांकी तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील अनेक राज्यांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमान ६ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले गेले. उत्तरपूर्व मध्य प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये काही भागांत दाट धुके पडले होते.

राज्यातील कोरड्या हवामानामुळे थंडी पुन्हा वाढणार
दिनविशेष 04 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दरम्यान, वाऱ्यांची प्रभावी चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे. या सर्व स्थितीचा प्रभाव राज्यातील हवामानावरही होईल. त्यामुळे पुढील पाच ते सात दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. रविवारपासून (ता. ४) राज्यातील किमान तापमानात घट चार ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी पुण्यात १२.६ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com