संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Dream Mall Fire | मॉलमध्ये रुग्णालय पहिल्यांदाच बघितले महापौर

Published by :
Published on

मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम्स मॉल मधील सनराईज हॉस्पिटलला गुरुवारी रात्री आग लागली. या रुग्णालयातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी
मॉलमध्ये रुग्णालय हे मी पहिल्यांदाच बघितले आहे. मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईच्या ड्रीम्स मॉलला रात्री आग लागली. या आगीनंतर रात्री महापौरांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पुन्हा घटनास्थळाला भेट दिली. या भेटीनंतर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, आगीची घटना समजल्यानंतर काल मध्यरात्री या ठिकाणी भेट देऊन मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयाबाबत विचारणा करून संबंधित कोविड रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये तात्काळ हलविण्याचे निर्देश दिले. मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे महापौरांनी सांगितले.

मृत झालेल्या रूग्णांची नावे –
१) निसार जावेद चंद्र (पुरुष वय – ७४ वर्ष)
२) गोविंदलाल दास (पुरुष वय – ८० वर्ष)
३) रवींद्र मुंगेकर (पुरुष वय -६६ वर्ष)
४) मंजुळा बथारिया (स्त्री वय -६५ वर्ष)
५) अंबाजी पाटील (पुरुष वय -६५ वर्ष)
६) सुधीर लाड (पुरुष वय -६६ वर्ष)
७) सुनंदाबाई पाटील (स्त्री वय – ५८ वर्ष)
८) हरीप सचदेव (पुरुष वय -६८ वर्ष)
९) श्याम भक्तीलाल (पुरुष वय – ७७ वर्ष)
१०) अज्ञात

जखमी रुग्णांची नावे –
१) चेतनदास गोडवाणी (पुरुष वय – ७८ वर्ष)
२) माधुरी गोडवाणी (स्त्री वय – ६८ वर्ष)
३) गिरीश मेमौन (पुरुष वय:-४३ वर्ष)
४) कुलदीप मेहता (पुरुष वय:-४८ वर्ष)
५) पुष्पक दरे (पुरुष वय:-६५ वर्ष)
इतर ३० रुग्णांना मुलुंड जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com