डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘व्हायरस’ आता‘ऑडिओबुक’मध्ये

डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘व्हायरस’ आता‘ऑडिओबुक’मध्ये

Published by :
Published on

प्रतिभावंत साहित्यिक पद्मभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला समृध्द केले आहे. २०१५ सालच्या 'साहित्य अकादमी पुरस्काराने' सन्मानित 'व्हायरस' हि सायन्स फिक्शन कादंबरी आता 'स्टोरीटेल मराठीच्या' लोकप्रिय 'ऑडिओबुक' मध्ये उपलब्ध झाली आहे. आवाजाच्या दुनियेतील जादूगार व्हॉइसिंग आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या खणखणीत आवाजात साहित्यप्रेमी आणि विज्ञानप्रेमी श्रोत्यांचं कुतूहल चाळवणारी हि कादंबरी 'स्टोरीटेल मराठीच्या' 'ऑडिओबुक' मध्ये ऐकणं आता पर्वणी ठरणार आहे.

'व्हायरस' 'स्टोरीटेल मराठी'च्या 'ऑडिओबुक' मध्ये ऐकत असताना अप्रत्यक्ष रित्या डोळ्यांसमोर एक परकीय जीवसृष्टी उभी राहते. या पुस्तकात समाविष्ट असलेल्या कथेत मानवी जीवनासमोर अस्तित्त्वात आलेले संकट उद्भवणार्‍या प्राणघातक विषाणूचा धोका दर्शविला गेला आहे. आलेल्या संकटावर वैज्ञानिक मिळून कशी मात करतात? हे जाणून घ्यायचं असेल तर , नक्की ऐका. प्रसिद्ध व्हॉईसओव्हर आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांनी या कथेला आवाज दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com