दाऊदशी संबंध असलेल्या डॉ. लांबेंची नियुक्ती फडणवीस सरकारच्या काळात

दाऊदशी संबंध असलेल्या डॉ. लांबेंची नियुक्ती फडणवीस सरकारच्या काळात

Published by :
Published on

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत मोठी खळबळ उडवून दिली होती. या पेनड्राईव्ह बॉम्बमध्ये त्यांनी वक्फ बोर्डावरील डॉ. लांबेचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी फडणवीस यांचे आरोप फेटाळले. मुदस्सीर लांबे यांच्याबाबतची तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे. या व्यक्तिची नेमणूक सरकारने केली नाही. या बाबतची निवडणूक 30 ऑगस्ट 2019 रोजी पार पडली होती, असे त्यांनी सांगत फडणवीस सरकारवरच आरोपांचा चेंडू फिरवला.

वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. शिवाय या मुदस्सीर यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा धक्कादायक दावा करतानाच या सरकारने चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असा संताप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विधानसभेत व्यक्त केला. दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी या व्यक्तिची नेमणूक सरकारने केली नसल्याची माहिती दिली. तसेच या बाबतची निवडणूक 30 ऑगस्ट 2019 रोजी पार पडली होती. ते निवडून आलेले सदस्य आहेत. विनाकारण दाऊद दाऊद (dawood) करू नका. त्यांचा जर दाऊदशी संबंध असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची, त्यांना काढून टाकायचं का याची कारवाई करू, अशी ग्वाही दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली.

फडणवीस सरकारनेच केली डॉ. लांबेची नियुक्ती

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी नवाब मलिकांवर (Nawab Malik) गंभीर आरोप केल्यानंतर मलिक यांची कन्या सना मलिक यांनीही ट्विट करून फडणवीस (devendra fadnavis) यांचा पर्दाफाश केला आहे. 13 सप्टेंबर 2019मध्ये लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती झाली होती. फडणवीस (devendra fadnavis) यांच्या सरकारनेच ही नियुक्ती केली होती. महाविकास आघाडीचं सरकार त्यानंतर नोव्हेंबर 2019मध्ये आलं. माझ्या वडिलांकडे अल्पसंख्याक विभागाचं खातं जानेवारी 2020मध्ये आलं, असं सना मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच फडणवीस यांचा आणि लांबे यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यावर डी गँगचा नातेवाईक आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), असं मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com