छत्रपती संभाजी नगरात डॉक्टरांचा दांडिया उत्सव चर्चेत
छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगरामध्ये एक दांडिया महोत्सव सर्वाधिक जास्त चर्चेत असल्याचा पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर आणि त्यांचा परिवार पहिल्यांदा रास दांडिया एकत्रित खेळत असल्याचा पाहायला मिळाले आहे.
डॉक्टरांना रास दांडिया खेळण्यासाठी रुग्नेसेवेतून वेळ मिळणे म्हणजेच कठीण बाब असते. मात्र फिनिक्स दांडिया उत्सवाच्या वतीने फक्त डॉक्टर आणि त्यांच्या परिवाराला तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांना वेळ मिळावा आणि रुग्नेसेवेतून स्वतःच्या परिवारासाठी वेळ देऊन एक कौटुंबिक वातावरण तयार व्हावं यासाठी हा फिनिक्स दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
मुलगी ही घरातील लक्ष्मी असते आणि मुलगी हे एक देवीच रूप असल्याची आख्यायिका आपण वारंवार ऐकली असेलच. या ठिकाणी देखील दंडियासोबतच कन्या पुजनाचे ही आयोजन करण्यात आले होते.