पत्नी आणि 2 मुलांना विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं की…

पत्नी आणि 2 मुलांना विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं की…

Published by :
Published on

पत्नी आणि दोन मुलांना विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर येथील कर्जत तालुक्यातून समोर येत आहे. महेंद्र थोरात असे या आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून संमतीने हा निर्णय घेत असल्याचे त्यात लिहिले आहे. तसंच आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला दान करण्याची इच्छाही त्यांनी नोटमध्ये लिहिले आहे. या घटनेमुळे नातलग, शेजारी यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. थोरात यांचे राशीनमध्ये हॉस्पिटल आहे. आज त्यांचे कुटुंबीय घरात मृतावस्थेत आढळून आले. डॉ. महेंद्र वर्षा थोरात, मोठा मुलगा कृष्णा (वय १६) व लहान मुलगा कैवल्य (वय ७) हे मृतावस्थेत आढळून आले. आधी तिघांना विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन थोरात यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

थोरात यांच्या घरात पोलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. त्यावरून मोठा मुलगा कृष्णा याच्या कर्णबधीर व्यंगाला कंटाळून हा प्रकार घडल्याचे दिसून येते. चिठ्ठीत म्हटले आहे की, आम्ही आज आपल्यापासून कायमच निरोप घेत आहोत. कृष्णाला कानाने ऐकू येत नाही. त्यामुळे त्याचे समाजामध्ये अपराधीपणाने राहणे आता सहन होत नाही. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालो आहोत. कृष्णाचे कशातच मन लागत नाही. मात्र, तो कधी बोलून दाखवत नाही. मात्र, त्याचे हे दु:ख आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी संमतीने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जबाबादर धरण्यात येऊ नये. असे कृत्य करणे आम्हाला योग्य वाटत नाही, मात्र इलाज नाही, आम्हाला माफ करा, असेही चिठ्ठीत म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com