सहा महिने उलटूनही त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बदली ठिकाणी सोडण्यास टाळाटाळ
वाशिम जिल्हा पोलीस विभागात प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या 2 जून 2023 रोजी बदल्या करण्यात आल्या होत्या. काही पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. तर, काही पोलीस कर्मचाऱ्यांना 6 महिने उलटून सुद्धा बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची गुप्त माहिती व बदलीचे पत्र पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकशाही मराठी दिले आहे. यावर नव्याने पदभार स्वीकारलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची दखल घेऊन बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करावे अशी मागणी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी दबक्या आवाजात करीत आहे.
जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन आज सहा महिने उलटले. मात्र अजूनही काही कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विलंब का लावला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे? पोलीस दलात बदली दरम्यान देवाण घेवाण करीत अनेक पोलीस कर्मचारी बदल्या होताना चर्चा असते? त्यातच आता वाशिम जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी याची प्रशासकीय बदली होऊन त्यांना अद्याप पर्यंत सोडण्यात आले नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लक्ष देऊन कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्याचे आदेश नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.