महाराष्ट्र
संत ज्ञानेश्वर महाराज परिसर फुलला… फुलांची मनमोहक आरास
पुण्याच्या आळंदीत पुत्रदा एकादशी निमित्ताने देशी – विदेशी फुलांची आरास पहावयास मिळाली. या सजावटीने अलंकापुरीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी परिसर फुलून निघालाय.
आजच्या एकादशीचे विशेष महत्त्व असते त्यामुळेच ही सुगंधी, आकर्षक रंगीबेरंगी फुलांची डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट आळंदी देवस्थान ट्रस्टने केलीये.