महिला बचत गटातर्फे दिवाळी फराळ साहित्य विक्री प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन

महिला बचत गटातर्फे दिवाळी फराळ साहित्य विक्री प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन

Published by :
Published on

अभिजीत हिरे | भिवंडी महानगरपालिका महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून दिवाळी निमित्त फराळ साहित्य व अन्य सजावट साहित्य प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून उदघाटन सोहळा महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी महापौर प्रतिभा पाटील यांनी शहरातील, नागरीकांना बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करा, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा असे आवाहन केले.

भिवंडी पालिकेच्या मुख्यालय जवळ दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका विभाग व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच दिवाळी साहित्य विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शहरातील निवडक 22 बचत गटांनी आपली दालने लावली असून यामध्ये, दिवाळी घरगुती फराळ, शोभिवंत दिवे, सजावट तोरण आदिसाहित्य विक्रीस उपलब्ध आहे. हे प्रदर्शन 1 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वा.पर्यंत सुरू राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com