टोमॅटोच्या बाजार भावावरुन वाद

टोमॅटोच्या बाजार भावावरुन वाद

Published by :
Published on

पुण्याच्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटो लिलावामध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये राडा झाला. टोमॅटोचे बाजारभाव पाडल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधे शाब्दिक चकमक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला.


सकाळी अकराच्या दरम्यान उपबाजारात टोमॅटोच्या प्रती कॅरेटला १३० इतका बाजारभाव होता. मात्र, त्यानंतर अचानक उपबाजारातील काही टोमॅटो व्यापाऱ्यांनी टोमॅटोचे बाजारभाव खाली पाडून प्रत्येक कॅरेटला ५० रूपये इतकी खरेदी बोली सुरू केली. यारुन शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये राडा झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com