दिशा सालियन प्रकरण; राणे पिता-पुत्र ‘या’ तारखेला पोलिस ठाण्यात उपस्थित राहणार

दिशा सालियन प्रकरण; राणे पिता-पुत्र ‘या’ तारखेला पोलिस ठाण्यात उपस्थित राहणार

Published by :
Published on

दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. मात्र त्यांच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली आहे. त्यामुळे राणे पिता-पुत्र आता ५ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत मालवणी पोलिस (Malvani Police) ठाण्यात उपस्थित राहाणार आहेत.

दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणी झालेल्या वक्तव्याबाबत दिशाच्या आईने मालाड पश्चिमच्या मालवणी पोलिस (Malvani Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मालवणी पोलिस (Malvani Police) याच प्रकरणाचा तपास करत आहेत.याअंतर्गत ३ आणि ४ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. मात्र राणे कुटुंबीयांचे वकील सतीश मानशिंदे यांनी पोलीस ठाण्यात पत्र लिहून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे वेळ वाढवून मागितली होती. त्यामुळे आता राणे पिता-पुत्र दोघेही ५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com