कोयना धरणातून ४९ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग

कोयना धरणातून ४९ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग

Published by :
Published on

सध्या राज्यात पाऊसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणात पाण्याचा स्तर वाढत आहे. गुरूवारी सकाळी साडे पाच फुटांवरुन दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्यात आले. त्यामुळे ४७ हजार क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू करण्यात आला . प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेतून एकूण ४९ हजार ३४४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. मागील २४ तासांत साडे सोळा टीएमसी पाणी वाढण्याचाही विक्रम नोंद झाली. कोयना, नवजा, महाबळेश्वर तापोळा, बामणोली भागात धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. तर पाऊस वाढल्यानंतर धरणाचे सहा दरवाजे १० फुटापर्यंत दरवाजे उचलण्यात आले होते. त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने साडे पाच फुटांपर्यंत दरवाजे खाली घेण्यात आले. गेले पाच दिवस दरवाजे साडे पाच फुटांवर स्थिर होते. पण, पश्चिम भागात पाऊस सुरूच असून धरणातही आवक होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com