महाराष्ट्र
”शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले”; ठाण्यात पोस्टरबाजी
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे परिसरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीची एकच चर्चा रंगली आहे. प्रताप सरनाईकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने ते गायब असल्याची चर्चा आहे.
'ओवळा-माजिवाडा मतदारसंघ वाऱ्यावर, आमदार महोदय कागदावर', 'ओवळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?' अशा आशयाची पोस्टरबाजी सरनाईक यांच्याविरोधात ठाणे परिसरात पाहायला मिळत आहे.
गेल्या महिन्यात ED आणि CBI ने प्रताप सरनाईक यांच्या लोणावला इथल्या एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकली होती. त्याबरोबर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ED ने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ED ने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. या चौकशीच्या ससेमिऱ्यानंतर ते गायब असल्याची चर्चा आहे.