...अन् थेट माजी नगराध्यक्षांनी रस्त्यावर उतरत सुरळीत केली वाहन व्यवस्था

...अन् थेट माजी नगराध्यक्षांनी रस्त्यावर उतरत सुरळीत केली वाहन व्यवस्था

इस्लामपूर शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजल्यानंतर निर्माण झालेल्या वाहतुकीचा खोळंवा सोडवण्यासाठी इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षांनाच थेट रस्त्यावर उतरावे लागले.
Published on

संजय देसाई | सांगली : इस्लामपूर शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजल्यानंतर निर्माण झालेल्या वाहतुकीचा खोळंवा सोडवण्यासाठी इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षांनाच थेट रस्त्यावर उतरावे लागले. आणि तासाभराच्या दमछाक केल्यानंतर भाजपा नेते व माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटलांनी जाम झालेलं ट्राफिक सुरळीत केले.

...अन् थेट माजी नगराध्यक्षांनी रस्त्यावर उतरत सुरळीत केली वाहन व्यवस्था
छगन भुजबळांच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

इस्लामपूर शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्याच्या हंगाम संपत आल्यामुळे इस्लामपूर शहरातले वाहतूक कोंडीने कहर केला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील कामेरी नाका कॅटेगरी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा अस्तित्वात नव्हती.

वाहतूक शाखेचे कर्मचारी देखील जागेवर नसल्याचे पाहायला मिळाले.त्यानंतर इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे ज्येष्ठ निशिकांत पाटील हे थेट स्वतः आपल्या गाडीतून उतरले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत मोठ्या प्रयत्नानंतर निशिकांत पाटील यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यासाठी प्रवासी आणि वाहनधारकांनी निशिकांत पोलीस पाटील कर्तव्याच्या भूमिकेचा आभार मानले.

...अन् थेट माजी नगराध्यक्षांनी रस्त्यावर उतरत सुरळीत केली वाहन व्यवस्था
विदर्भच नव्हे देश वाचवण्यासाठी एकत्र येण्याची वेळ - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

दरम्यान, शहरातली वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी खंत व्यक्त केली. जिल्हा पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी अधिकच्या यंत्रणेची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com