Dilip Kumar Health Update | दिलीप कुमार यांच्या तब्येतीत सुधारणा
हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता सुधारत आहे. याची पुष्टी दिलीपकुमार यांचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी शुक्रवारी दिली. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यात अडचण झाल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू) ठेवण्यात आले. सध्या दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक असून येत्या एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल.
मंगळवारी (29 जून) 98 वर्षीय दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांचे वयही अधिक आहे, ज्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. फैझलने सांगितले की, आता दिलीप कुमार ठीक आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो रुग्णालयातच राहतील, जेणेकरुन डॉक्टर त्यांचे वय लक्षात घेऊन आवश्यक वैद्यकीय उपचार देऊ शकतील.