महाराष्ट्रात दिवसभरात 26 हजार 538 नव्या रूग्णांचं निदान

महाराष्ट्रात दिवसभरात 26 हजार 538 नव्या रूग्णांचं निदान

Published by :
Published on

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. यातच ओमायक्रॉनचा देखिल शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 26 हजार 538 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 8 मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात 5331 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 65 लाख 24 हजार 247 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.55 टक्के झाला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे नवे 144 रूग्ण आढळले आहेत. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com