धारावीकरांना आता 350 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. मात्र धारावीकरांनी 500 चौरस फुटांच्या घराची मागणी लावून धरली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये पात्र रहिवाशांना 350 चौरस फुटाचे घर देण्यात येणार असल्याची घोषणा अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या ‘धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड’ने केली.
500 चौ फुटाचे घर मिळावे अशी धारावीकरांची मागणी आहे. या मागणीसाठी धारावीकरांनी आंदोलनं केली. तसेच त्यांनी इशाराही दिला आहे की, ही मागणी मान्य झाल्याशिवाय प्रकल्प मार्गी लावू दिला जाणार नाही.
धारावीचा कायापालट करण्यासाठी सरकारने प्रकल्प हाती घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी ५०० चौ फुटाच्या घरांची मागणी केली. धारावी बचाव आंदोलनाने ही मागणी उचलून धरली आहे. या पार्श्वभूमीवर डीआरपीपीएलने पात्र रहिवाशांना ३५० चौ फुटाचे, १ बीएचके घर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.