फडणवीसांच्या काळात DGIPR अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा; देवेंद्र यांची  पहिली प्रतिक्रिया

फडणवीसांच्या काळात DGIPR अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा; देवेंद्र यांची पहिली प्रतिक्रिया

Published by :
Published on

इस्त्रायली स्पायवेअर असलेल्या पेगॅससच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले असतानाचा आता महाराष्ट्रातही या स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असल्याचा आरोप होत असतानाचा यासंदर्भात डीजीआयपीआरच्या अधिकाऱ्यांचा त्यासाठी इस्त्रायल दौरा झाल्याचा देखील आरोप होत आहे. हा दौरा देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना झाला होता. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2019 मध्ये राज्य सरकारच्या 5 महत्वाच्या अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा झाला होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनताना हे 5 अधिकारी इस्त्रायल दौऱ्यावर गेले होते. हे अधिकारी इस्त्रायला का गेले होते? असा सवाल महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेते आता विचारत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी हे अधिकारी शेती विकासाच्या विषयाच्या अभ्यासाठी इस्त्रायल दौऱ्यावर गेल्याचं सांगितलं होतं.

सप्टेंबर २०१९मध्ये हा दौरा नियोजित करण्यात आला, तर नोव्हेंबर २०१९मध्ये हा दौरा प्रत्यक्षात पार पडला. हा दौरा मुळात माध्यमविषयक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी होता असं आता समोर आलं आहे. या दौऱ्यासंदर्भातलं इस्त्रायलच्या मुंबईतील दूतावासाकडून तत्कालीन सचिव ब्रिजेश सिंह यांना पाठवण्यात आलेलं पत्र समोर आलं असून त्यामध्ये नेमका या दौऱ्याचा काय हेतू होता, त्याविषयी माहिती देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com