Devendra Fadnavis : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले...
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्विट करत देण्यात आली आहे. नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले की, वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा मा. राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. मी मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे.
सुमारे 7015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.