Devendra Fadnavis | "ठाकरे सरकार मे महिन्यात जनतेला एप्रिल फुल बनवतंय"
मोदी सरकारला (Modi government) ३१ मे ला ८ वर्ष पूर्ण होणार आहे. भारताच्या इतिहासात नव भारत निर्मितीची ८ वर्ष पूर्ण होणार आहे. मोदी सरकारमध्ये आल्यानंतर प्रत्येक गरीबाला वाटू लागलं हे माझं सरकार आहे. सगळा देश माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, असा व्यापक विचार करत मोदींनी काम केलं, असंही भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel) वरील कर कपातीवरून ठाकरे सरकार मे महिन्यात जनतेला एप्रिल फुल बनवतंय आहे अशी टिका फडणवीसांनी केली आहे.
भाजपा नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे (BJP Leaders meeting in Mumbai). या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, "संपूर्ण बहुमताचं सरकार आल्यावर एखादा नेता काय करू शकतो हे मोदींनी दाखवून दिलं. कितीही टीका झाली तरी त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. सामान्य माणसाचं सबलीकरण करणं, त्याला शक्ती देणं हे काम मोदींनी केलं. गरीबाला वाटू लागलं हे माझं सरकार आहे. माझे पंतप्रधान, माझ्यासाठी विचार करणारे पंतप्रधान, असं गरीबाला पहिल्यांदाच वाटलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी इतकं सिमीत नाही, तर सगळा देश माझं कुटुंब माझी जबाबदारी असा व्यापक विचार करत मोदींनी काम केलं".
जगाच्या पाठीवर कोरोनानंतर आणि रशिया युक्रेन युद्ध ( Russia-Ukraine war) सुरू झाल्यानंतर मोठं संकट निर्माण झालंय. महागाई भाववाढ जगभरात झालीये. त्याचवेळी याबद्दल ठोस उपाययोजना करणारा भारत देश. युद्धामुळे अनेक युरोपीय देश आखाती देशाकडून तेल घेतील, ते महाग होईल, हे कळल्यानंतर आपण तात्काळ रशियाकडून तेल घेण्याचा निर्णय़ घेतला, अनेक देशांनी दबाव आणला, अमेरिकेनेही आणला.
तेव्हा आपले परराष्ट्र मंत्री म्हणतात की तुमचे युरोपातले सगळे देश मिळून जेवढं ऑईल वापरतात, तेवढं आम्ही वर्षभर पुरवतो. तुम्ही जर तिथून घेऊ शकता तर आम्ही का घेऊ शकत नाही? आम्ही ते तेल घेणार, आम्ही आमच्या देशाचं हित लक्षात घेणार आणि स्वस्तात तेल घेणार. असं सांगत आपण त्यांच्या नाकावर टिच्चून रशियाकडून तेल खरेदी केली. महाग तेल विकत घेतलं असतं तर आज महागाई किती वाढली असती. २ लाख २० कोटी रुपयांचं नुकसान सहन करून केंद्राने या आंतरराष्ट्रीय संकटातूनही देशाला दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला.
मोदींनी आपली दिशा बदलली नाही
या ८ वर्षात कितीही आरोप झाले, टीका झाली, तरीही मोदींनी आपली दिशा बदलली नाही, समर्थ, शक्तिशाली भारत तयार करायचा असेल तर बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारची निती आपल्याला राबवावी लागेल, या देशातल्या गरिबाच्या कल्याणाचा अजेंडा हाच देशाला शक्तिशाली बनवू शकतो, मुठभर लोक शक्तिशाली झाले तर कुठलाच देश ताकदवर होत नाही.
माझं कुटुंब माझी जबाबदारी इतपत ते सिमीत नाही
मोदी सर्वांचा विचार करतात, त्यांचं मोठं कुटुंब आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी इतपत ते सिमीत नाही, संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारत माझं कुटुंब, त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी अशा भावनेतून हा गरिब कल्याणाचा अजेंडा राबवत प्रत्येक मुलभूत गरज पूर्ण करण्याचं काम हे मोदींनी केलं, हे करत असताना भारताला त्यांना ज्या प्रकारे शक्तिशाली केलं