इतिहासातील सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

इतिहासातील सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Published by :
Published on

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. यावेळी विरोधकांच्या गोंधळातच विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झालं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे हे आज सिद्ध झालं असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक, ठरवून चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन चर्चा न करता, हे विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप आज सरकारने केलं आहे. दुर्दैवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालय देखील पूर्णपणे सहभागी असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे हे आज सिद्ध झालं असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

राज्य सरकारला विद्यापीठांना आपलं शासकीय महामंडळ बनवायचंय, नवीन विद्यापीठ कायद्याने आतापर्यंतच्या कुठल्याही कायद्यात कधीही मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक बाबीत ढवळाढवळ करण्यासाठी कुठलीही तरतूद नव्हती. असेही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com