आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार ? देवेंद्र फडणवीस

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार ? देवेंद्र फडणवीस

Published by :
Published on

भांडुपमधील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत हॉस्पिटलासुद्धा आग लागली आहे. या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावरून आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर सरकारला जाग येणार ? अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

भांडुपमधील ड्रीम्स मॉलमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात करोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर जवळपास ७० करोना रुग्णांची सुटका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणे योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे ? असा सवाल करत सदर घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तर दुसरीकडे "दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ठिकाणी आग लागली आणि पसरत वर गेली. हॉस्पिटलमधील सर्व कोराना रुग्णांना बाहेर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण काही जण व्हेटिलेटरवर होते त्यांना काढण्यास वेळ लागला. इतर रुग्णांची सुटका झाली पण त्यांची सुटका करण्यात वेळ लागला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com