Devendra Bhuyar : भाजप प्रसाद उमा बाईच्या हातावर देणार
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) मतदानास सुरुवात झाली आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही अपक्ष आमदारांवर विजयासाठी मोठे पक्ष अवलंबून आहेत. तर, मागील निवडणुकीत चर्चेत आलेले आसदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी गैरसमज दुर झालेले आहेत, असे विधान केले आहे.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आणि भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले. विजयाचं समीकरण चुकल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचं मत फुटल्याचा थेट आरोप केला होता. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली. व आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचे त्यांनी म्हंटले होते.
विधान परिषदेसाठी मतदान करताना देवेंद्र भुयार म्हणाले, यावेळेस निवडणुकीचे नियोजन केलेले आहे. प्रमुख नेत्यांनी योग्यरित्या नियोजन केले आहे. राज्यसभेचा नेत्यांसोबत चर्चा झाली असून गैरसमज दूर झाला आहे. याचा परिणाम म्हणजे भाजप प्रसाद उमा बाईच्या हातावर देणार हेही तुम्हाला आत्ताच सांगतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदावार रिंगणात असून भाजप आणि महाविकास आघाडी समोरासमोर आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड व शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर आणि राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप मैदानात आहेत.