राज्यात डेंग्यूने 22 जणांचा मृत्यू; उपराजधानीत सर्वाधिक 10 जणांचा मृत्यू

राज्यात डेंग्यूने 22 जणांचा मृत्यू; उपराजधानीत सर्वाधिक 10 जणांचा मृत्यू

Published by :
Published on

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियानं डोकं वर काढलं आहे.डेंग्यूमुळे आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूचे सर्वाधिक १० मृत्यू नागपूरमध्ये झाले असून त्यानंतर चंद्रपूर, वर्धा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात पावसाचे प्रमाण कमी होताच ऑगस्टपासून डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव तुलनेने कमी दिसत होता. यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरत असलेल्या काळात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार पुन्हा वाढल्याचे आढळते.

ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे सुमारे तीन हजार रुग्ण आढळले होते आणि ११ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये मात्र डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला असून ३४०१ रुग्ण नव्याने आढळले आहेत.ऑक्टोबरमध्ये तुलनेने रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही आजाराचा प्रादुर्भाव फारसा कमी झालेला नाही. ऑक्टोबरच्या २० दिवसांमध्ये डेंग्यूचे १२५१ रुग्ण नव्याने आढळले आहेत.२० ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, राज्यात डेंग्यूचे ९ हजार ५४१ रुग्ण आढळले असून २०१९ च्या तुलनेत चौपट वाढ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com