अबब...! शेतकऱ्याच्या 'चंद्रा' नावाच्या बोकडाला लाखोंची मागणी

अबब...! शेतकऱ्याच्या 'चंद्रा' नावाच्या बोकडाला लाखोंची मागणी

चंद्रकोर असलेल्या बोकडाला बाजारात चांगली मागणी
Published on

आदेश वाकळे | संगमनेर : सध्या मुस्लिम बांधवाचा बकरी ईदचा सण जवळ येत आहे. या कारणाने चंद्रकोर असलेल्या बोकडाला बाजारात चांगली मागणी येत आहे. अशातच आता संगमनेरमधील शेतकऱ्याच्या 'चंद्रा' नावाच्या चंद्रकोर असलेल्या बोकडाला लाखोंची मागणी आहे.

ईदच्या पार्श्‍वभूमीवर कपाळी चंद्रकोर असलेल्या बोकडाची खरेदी व विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसते आहे. यातच संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला गावचे रहिवाशी शेतकरी किसन गंगाधर कडनर यांच्या चंद्रा नावाच्या कपाळी चंद्रकोर असलेल्या बोकडला आता लाखों रुपयांची मागणी येत असल्याचे बोलले जात आहे. 17 ते 18 महिन्यांचा २ दात असणारा बोकड किसनराव कडनर यांनी बाजारात विक्रीसाठी नेला असता त्यास १ लाख ५१ हजार रुपये किंमत मिळाली होती, अशी माहिती शेतकरी यांनी दिली.

मात्र, त्यांना हवी असलेली व अपेक्षेप्रमाणे रक्कम न मिळाल्याने त्यांनी तो बोकड विकला नाही. परंतु, किसनराव यांना सदर चंद्रकोर असलेल्या बोकडची किंमत तीन ते साडेतीन लाख रुपये इतकी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सदर चंद्रा बोकडची योग्य व अपेक्षेप्रमाणे किंमत मिळाल्यास तो विकणार असल्याची माहिती यावेळी शेतकरी किसनराव कडनर यांनी दिली. शेतकरी किसनराव हे चंद्रा बोकडला नित्यनेमाने गहू, सरकी पेंड, घास, मका आदी प्रकारचे खाद्य खाऊ घालतात. तर, चंद्रा नावाचा बोकड शेतकरी किसनरावांचे भाग्य उजळवणार हे मात्र नक्की आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com