बेळगाव हिवाळी अधिवेशन; महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी

बेळगाव हिवाळी अधिवेशन; महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी

Published by :
Published on

नंदकिशोर गावडे, बेळगाव | बेळगाव व सीमाभागात मराठी अस्मितेसाठी वेळोवेळी लढा उभारणाऱ्या महाराष्ट्र एककीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी सध्या बेळगाव येथे सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात केली जातेय.काल अधिवेशनात महाराष्ट्र एक्कीकरण समिती विरोधात कर्नाटकातील सर्वपक्ष एकवटले असल्याचे चित्र पाहायला मिळालं..

गेली 65 वर्ष सीमाभागातील मराठी माणसासाठी लढणारी महाराष्ट्र एक्कीकरण समितीवर वारंवार सीमाभागात अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप करत समितीवर बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर यावर मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई बोलत असताना गेल्या चार दिवसात घडलेल्या अप्रिय घटनासंबधी अटक करण्यात आलेल्या सर्वांवर गुंडा कायदा करण्याबरोबर देशद्रोहाचे कलम लावण्यात येतील अशी घोषणा केली आहे. याबाबत एकमताने ठरावही पारीत करून गृहखात्याला पाठवण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com